महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारासाठी झंझावती बाईक रॅली बाईक रॅलीने मुल नगरात पंजा घराघरात पोहचला

0
365

मुल – महा विकास आघाडीचे काँग्रेसचे विश्वासू ,क्षेत्रातील गोर गरीब जनतेच्या नेहमी संपर्कात राहणारे, सर्वसामान्य जनतेच्या सर्व समस्यां सोडविणारे ,आपला घर सकाळ पासून सर्वांसाठी खुला दरबार ठेऊन समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देणारे सर्वांचे लाडके लोकप्रिय उमेदवार श्री.संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक १६/११/२०२४ रोजी मुल शहरातून भव्य आकर्षक,झंझावती बाईक रॅली काढून समस्त मुल वाशियांच्या घराघरात पंजा पोचविला. इतकी भव्य दिव्य बाईक रॅली पहिल्यांदाच केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचीच निघाली असून या बाईक रॅलीने समस्त मुल वासिय जनतेचे लक्ष वेधून घेतले.यामधे महिलांचाही सहभाग दिसून आला. सर्वत्र महाविकास आघाडीत सहभागी असणारे कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना ( उबाठा), आरपीआय, यांचेसह सहभागी असणारे सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते सहभागी झाले होते.

 

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे स्थानिक उमेदवार म्हणून संतोषसिंह रावत यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने श्री.रावत यांनी बाजू मजबूत करणारा असल्याची चर्चा केली जात आहे. तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याची चर्चाही क्षेत्रात रंगत आहे. आजच्या भव्य रॅलीचे नियोजन उमेदवार संतोषशिंह रावत यांनी महाविकास आघाडीचे झेंडे दाखऊन करण्यात आली. रॅलीत संतोषभाऊ यांची पत्नी ममता रावत, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित समर्थ, शिवसेना (ऊबाठा) तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार,तालुका महिला अध्यक्षा अर्चना चावरे,काॅंग्रेस जिल्हा महासचिव सभापती रांकेश रत्नावार,जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, रुपल रावत, छोटू रावत, दीपक चुगानी,युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,उपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, डेव्हिड खोब्रागडे, चीटलोजवार, चेतन कामडी,गणेश रणदिवे, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहराध्यक्ष नलिनी आडपवार, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, उपाध्यक्ष समता बनसोड,सचिव शामल बेलसरे, वर्षा पडोळे, उषा मुरकुटे माधुरी गुरनुले, संध्या चौधरी, शहर कांग्रेस ,ग्रामीण कांग्रेस, युवक काँग्रेस, महिला कांग्रेस असंख्य पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या रॅलीची सर्वत्र चर्चा.

Previous articleनिवडणुकीच्या धामधुमीतही ना. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे ४२ धान खरेदी केंद्रांना मंजुरी
Next articleमहाराष्ट्रात काँग्रेसची लाट.. सर्वसामान्यांच्या जीवनात आता नवी पहाट !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here