आराधी गीतातून कोरोनाचा जागर

0
244

सुंदरखेडच्या श्रीमहालक्ष्मी आराधी मंडळाचा उपक्रम
प्रशांत खंडारे |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
लोककलेची आज देश-परदेशात वाहवा होत असली, तरी खेड्यातल्या सामान्य कलाकारांनी पोटाला चिमटा काढून ती जगवली आहे. बुलडाणा लगतच्या सुंदरखेड येथील श्री महालक्षी आराधी मंडळाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मच्छी ले आऊट, तानाजी नगर येथे ४ ऑक्टोंबर रोजी कोरोना विषयक गाण्यांतून जनजागृती केली.
लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे गोंधळ, भजन, कीर्तन, भारूड, वासुदेव, पोतराज, जोगते, आराधी, शाहीर, वाघ्या-मुरळी यासह लोककलांचे अनेक प्रकार महाराष्ट्रात आहेत. बापजाद्यांनी जोपासलेली ही कला कोणत्याही अपेक्षाविना लोककलावंत पुढच्या पिढीच्या हाती सोपवून कलेचे जतन करत आहेत. या कलांचा उपयोग सामाजिक प्रश्नांच्या जागरणासाठी केला जातो.४ ऑक्टोंबरला मच्छी ले आऊट येथे श्री महालक्ष्मी आराधी मंडळाने संगीतमय भजन आणि गाण्यांमधून कोरोना संदर्भात जागर केला. मास्क लावा, स्वच्छ हात धूवा, सोशल डिस्टंन्सींग ठेवा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे अनेक संदेश या वेळी देण्यात आले. गावोगावी जाऊन सदर मंडळ कोरोना विषयक जनजागृती करणार असल्याचे शाहीरांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात शाहीर शंकरमोरे, प्रमोद कुळकर्णी, विजय चिंचोळकर, किसन चव्हाण, मिराताई ठाकरे, अंजूताई दराखे, द्वारकाबाई परिहार, कुसुमताई मोरे, इंदूताई मिसाळ, रमाबाई जाधव, रुस्तम मोरे, रेखा खरात, राजेंद्र सवदे, अनिता मोरे, नामदेव पवार यांनी सहभाग घेतला होता.

Previous articleअतिवृष्टीनंतर आता सोयाबीनला आग
Next articleराज्य शासन सोयाबीन ३८८० रुपये हमी भावाने घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here