प्रस्थापित उमेदवार पोहोचले आपल्या प्रचाराच्या नीच पातळीवर, अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनर वर केली शेणफेक

0
172

बल्लारपूर(72) मतदार संघातून डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

डॉ.गावतुरे यांची मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून त्यांना समाजातील सर्व स्तरातून विशेषातः युवा, शेतकरी,शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला,डॉक्टर,वकील तथा पुरोगामी विचारवंतांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहेत. त्यामुळे आपला पराभव होते की काय या धास्तीमुळे त्यांचे विरोधक नीच स्थरावर जाऊन प्रचार करीत आहेत. कुठे त्यांच्या लावलेल्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली तर कुठे त्यांचे बॅनर फाडून त्यांचा अपमान करण्यात आला.
असाच महिलांचा अपमान येथील विद्यमान आमदार यांनी लोकसभेच्या प्रचार दरम्यान केला होता व त्यामुळे लोकांनी विशेषातः महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखविली त्यांचा दारून पराभव झाला.त्यामुळे डॉ. अभिलाषा ताईच्या बॅनरवर जी शेणफेक झालेली, त्यामागे कोण प्रस्थापित आहेत हे आता लपून राहिलेले नाही.
आणी तसे जर असेल तर अगोदरच एका महिले कडून लोकसभेत एका प्रस्थापिताचा पराभव झाला. यावेळी सुद्धा या प्रस्थापितांचा पराभव एक महिलाच करेल असे बोलले जात आहे.

Previous articleआदिवासी विकास परिषदेचा संतोष रावत यांना जाहीर पाठिंबा
Next articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन बल्लारपूर मतदारसंघात रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here