महायुती सरकार काळात राज्यातील २ लक्ष ५३ हजार महिला बेपत्ता आहेत. दररोज ५ महिला, मुलींवर अत्याचार केल्या जात आहे. महिलांची व मुलींची अब्रू लुटणारे सर्रास मोकाट फिरत असून त्यांची पाठराखन करण्याचे काम महायुती सरकारने केले. या अपयशाने खचलेल्या महायुती सरकारने महिना भगिनींची मते मिळवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणून केविलवाणा प्रयत्न चालविला. मात्र राज्यात वाढलेली प्रचंड गुन्हेगारी, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांची अवहेलना यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला असून महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला गहाण ठेवनाऱ्या महायुतीला नाराज मतदार मतदानातून धडा शिकवतील अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
ते बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडी व घटक पक्षाचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ फॉर्म भरणा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
आयोजित प्रचार सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत, काँग्रेसचे दिनेश चोखारे रा. कॉ. जिल्हाध्यक्ष बेबी उईके, चंदू पाटील मारकवार गिरिदास चौधरी तथा महाविकास आघाडी व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे महाराष्ट्रात पक्ष फोडून आमदार खरेदी करण्याचा पराक्रम भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी केला. हे राज्याच्या संस्कृतीला असाजेशे आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारने राज्यात एकही उद्योगांना नाही तर येणारे उद्योग गुजरातला पाठविल्या गेले. यामुळे राज्यात प्रचंड बेरोजगारी फोपावली आहे. सरकारमधील राज्यकर्ते शासन तिजोरीवर डल्ला मारण्यात मग्न असताना समाज विकृत नराधमांनी महाराष्ट्रातील आया बहिणी व मुलींच्या अब्रूवर हात घातला. एकीकडे बहिणींना दीड हजार दिल्याचा देखावा व दुसरीकडे खाद्यतेल, विज बिल, व इतर जीवनाचे वस्तूंचे प्रचंड दरवाढ करून लुट सुरू आहे. तुमचे आमदार मुनगंटीवार हे वनमंत्री असून त्यांनी पोसलेले वाघ येथील मनुष्यांच्या जीवावर उठत असताना त्या वाघांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे संतोष रावत हे सक्षम उमेदवार आहेत. यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारले होते. मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अडेलतट्टू व मगरूर धोरणामुळे आंदोलनकर्ते महिला, पुरुष बालगोपाल यांचेवर लाठीचार्ज करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंदवून हुकूमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्यात आले. बाहेरच्या ठेकेदारांना आणून खोट्या विकासाच्या थापा मारणाऱ्या निवृत्तीचे नारळ बहाल करा असे उपस्थित त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत म्हणाले. आयोजित सभेस पोंभुर्णा तालुक्यातील व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.