छटपूजेमध्ये नारीशक्ती म्हणून डॉ.अभिलाषा गावतुरे यांचा सन्मान

0
54

चंद्रपूर :- दुर्गापुर डब्लू सी एल कॉलनी मध्ये छटपूजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील गणमान्य व्यक्ती हजर होते. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचाही छटपूजेच्या कार्यक्रमात आमंत्रित करून नारीशक्ती म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांद्वारा करण्यात आले .यावेळी मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उत्तर भारतीय छट भैया संघातील पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यामध्ये प्रामुख्याने माजी उपमहापौर अनिल फुलझले, रघुवीर हंसराज अहिर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षांमध्ये डॉक्टर अभिलाषा यांनी कुठलाही जात-पात धर्मपंथ याचा भेद न करता केलेल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे सर्व समाजातील लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत. करोना काळात जेव्हा लोक ऑक्सिजन विना तडफडून मिळत होते त्यावेळी पैशाच्या पाठीमागे न धावता सर्व समाजातील लोकांना मोफत सेवा देण्याचं एक पुण्यकार्य डॉक्टर अभिलाषा  यांनी केलं. गावोगावी लाभोरा उघडणे असो विद्यार्थ्यांना पुस्तक रूपाने मदत करणे असो शेतकऱ्यांची आंदोलन असो महिलांचे सक्षमीकरण असो या सर्व क्षेत्रात त्यांनी केलेली भरवी कामगिरी मी अतुलनीय आहे आणि म्हणून डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांची लोकप्रियता केवळ एखाद्या समाजापुरता किंवा समूहपूर्ती मर्यादित नसून संपूर्ण जनतेमध्ये त्या लोकप्रिय आहेत आणि मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत याचीच ग्वाही हा कार्यक्रम देत होता.

Previous articleडॉ. अभिलाषा गावतुरे यांना निवडून आणण्यास ओबीसी सेवा संघ कटिबद्ध – इंजि. प्रदीप ढोबळे
Next articleकोठारीत डॉ.अभिलाषा गावतुरे यांची प्रचार सभा सम्पन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here