ना. सुधीर मुनगंटीवार यांचे भगीरथ प्रयत्न  4075 लोकांना प्रत्यक्ष रोजगार ..!

0
85

बल्लारपुर (का.प्र.) : मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात 11 उद्योग स्थापन झाले असून मूलवेबऔद्योगिक विकासात आघाडी घेतली आहे. 2011 ते 2024 पर्यंत एकूण 11 उद्योग येथे उभे झाले यातील असून 6 उद्योगाचे बांधकाम प्रस्तावित आहेत. मूलच्या या औद्योगिक क्रांतीची चर्चा सर्वत्र होत आहे.

मुळात मूल तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी उद्योगांपासून हा तालुका वंचित होता.

काँग्रेसचे अनेक वर्षे राज्य असतांना मूलवासीयांच्या पदरी निराशा पडली. 2009 मध्ये येथील आमदार म्हणून नागरिकांनी विजयाची माळ सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात घातली आणि 2011 पासून येथील औद्यीगिक वसाहतीत उद्योग येण्याला सुरवात झाली. मूल मधील उद्योग येथील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नांचे फलित असल्याची चर्चा होत आहे.2009 नंतर आले हे उद्योग :

ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामे वेळेत पूर्ण करण्यात आली. 2011 मध्ये 490 कोटींचा मे.जी.आर. कृष्णा फेरो अलाईड प्रा.ली ने 490 कोटींची गुंतवणूक करून वीज निर्मितीचा प्रकल्प उभा केला, यातून 750 लोकांना रोजगार मिळाला. या पाठोपाठ 2012 ला मे. ग्रेटा एनर्जी ली. ने 600 कोटी, 2014 ला राजुरी स्टील अलाय ने 114 कोटी, 2018 ला गजानन इन्फ्रा इंजिनियरिंग, 2023ला महिला आर्थिक विकास महामंडळ ने 635 कोटीव कर्णिवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड 176.50 कोटीची गुंतवणूक करीत औद्योगिक विकास साधला. येथील औद्योगिक विकास आणखी गतीने व्हावा म्हणून मेसर्स जीआर कृष्णा फेरो ओलाईड प्रायव्हेट लिमिटेड (740 कोटी), मेसर्स चिंतामणी फॅब्रिकेशन प्रायव्हेट लिमिटेड (350 कोटी), मेसर्स दीनानाथ अलाईट स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड (160 कोटी), (452 कोटी), मेसर्स भाग्यलक्ष्मी मेटल प्रायव्हेट लिमिटेड (452 कोटी) मे. साई लोन प्रायव्हेट लिमिटेड (65 कोटी) यांनी गुंतवणूक केली आहे. यातील 5 उद्योगाचे बांधकाम प्रस्तावित असून इथेनॉलचे उत्पादन करणाऱ्या कॉर्निवल इंडस्ट्रीजचे काम प्रगती पथावर मूल तालुका उद्योगात अग्रेसर झाला आहे.

4000 लोकांना नोकरी :

मूल येथील औद्योगिक वसाहतीत 6 उद्योग उभे असून आणखी 5 उद्योग काही महिन्यात उभे राहणार आहे. नवीन प्रस्तावित उद्योगातून 2600 लोकांना नोकरी मिळणार आहे. यापूर्वी 1475 लोकांना नोकरी देण्यात आले. नवीन उद्योग उभे झाल्यानंतर एकूण 4045 लोकांना प्रत्यक्ष नोकरी तर हजारो युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

Previous articleना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सुरू झाला 15 गावांचा पाणी पुरवठा
Next articleपोंभूर्णा तालुक्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा बेरोजगारीला कंटाळून कांग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here