बल्हारपूर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे विकास कामावर प्रेरीत होवून, विविध पक्ष त्यांना आपला पाठींबा जाहीर करीत आहे. आज तेलंगानातील भारत राष्ट्र समितीने मुनगंटीवार यांना पाठींबा दिल्यांने सुधीर मुनगंटीवार यांचे मताधिक्यात वाढ होणार आहे.
भारत राष्ट्र समितीचे काम चंद्रपूर जिल्हयात फारसे नसले तरी, बल्हारपूर, दुर्गापूर, उर्जानगर भागात मोठ्या प्रमाणावर तेलगू समाजातील नागरीक अनेक वर्षापासून राहतात. या मतदारांवर भारत राष्ट्र समितीचा प्रभाव आहे. यामुळेच भारत राष्ट्र समितीने सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिल्यांने, त्यांचा विजय आणखी मजबूत झाला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयात विकास कामाचा धडाका लावला. अनेक विकास कामे पुर्णत्वास आणली. अनेक विकास कामे प्रस्तावित असून, बल्हारपूर विधानसभेचा चेहरा—मोहरा त्यांनी बदलविला आहे. विकास कामे करतांना त्यांनी जात—धर्म—भाषा यात भेदभाव केला नाही. मुनगंटीवार यांचा तेलगु समाजाशी विशेष स्नेह, आपुलकी असल्यांने, हा मतदार सुधीर मुनगंटीवारच्या विकासासोबत आहे. यातच भारत राष्ट्र समितीने सुधीर मुनगंटीवार यांना अधिकृत पाठींबा जाहीर केल्यांने मुनगंटीवार यांचा विजय सोपा झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारत राष्ट्र समिती ही महायुतीचा घटक पक्ष नाही मात्र केवळ मुनगंटीवार यांच्या विकासाचे रथ पुढे नेण्याकरीता त्यांनाच हा पाठींबा जाहीर केला आहे.