औद्योगीक नगरीच्या दिशेने मूल शहराची वाटचाल — मुनगंटीवार यांचे प्रयत्नाने मूल शहरात निर्माण होणार रोजगार!

0
99

पूर्वी मागास समजल्या गेलेला मूल शहर लवकरच औद्योगीक नगरी म्हणून नावलौकीकास येणार आहे. या भागाचे नेतृत्व करणारे दंबग नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कल्पकता, सततचा पाठपुरावा यामुळे मूल शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. धानपट्टा म्हणून ओळखल्या जाणारा मूल तालुका भविष्यात औद्योगीक रोजगार देणारा तालुका म्हणून प्रसिध्दीस येईल या दिशेने या क्षेत्राची वाटचाल सुरू आहे.

मूल जवळील आकापूर एमआयडीसीत आता नविन उद्योगासाठी जागा नाही. मूल शहराचा व परिसराचा विकास झाल्यांने, येथील एमआयडीसीत पाणी, वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या उपलब्ध करून दिल्यांने राज्यातील गुंतवणूकदारांची, उद्योगपतीची मूल एमआयडीसीला पहिली पसंती मिळाली आणि अनेक उद्योगासाठी येथे जागा बुक केल्या आहेत. एमआयडीसीत आता जागा नसल्यांने, या एमआयडीसीचे क्षेत्र वाढविण्यासोबतच, पर्यायी व्यवस्था करण्यांत येणार असल्यांने, येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीती होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मूल एमआयडीसीत नुरी राईल मील, जी. आर. कृष्णा फेरो अलाईड प्राय. लिमी. मे ग्रेटा एनर्जी, राजुरी स्टिल अलाय प्राय. लिमी. गजानन इन्फ्रा इंजिनीयरींग प्राय. लिमी., महीला आर्थीक विकास महामंडळ, कार्निवल इंडस्ट्रीज प्राय. लिमी. जी. आर. क्रिष्णा फेरो अलाईड प्रा. लिमी. (नविन प्रकल्प), चिंतामणी फेब्रीकेशन प्राय. लिमी. दिनानाथ अलाईड स्टिल मॅन्यूफॅक्चरींग प्रा. लिमी., भाग्यलक्ष्मी मेटल प्रा. लिमी. साईलान स्टिल प्रा. लिमी या कंपन्यानी 3702 करोड रूपयाची गुंतवणूक केली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर 4855 तरूणांना प्रत्यक्ष तर हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

एमआयडीसीतील उद्योगासोबतच मूल तालुक्यात नविन पॉलिटेक्नीक कॉलेज उघडण्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यांने, मूल तालुक्यावरील मागास तालुका हा शिक्का पुसून, औद्योगीक विकसीत तालुका म्हणून नावारूपास येईल असा विश्वास या भागातील नागरीक व्यक्त करीत आहे.

Previous articleगर्दीतून मार्ग काढत महिलेने केले ना. मुनगंटीवार यांचे औक्षण बहिणीच्या प्रेमाने भारावले ना. सुधीर मुनगंटीवार
Next articleडॉ. अभिलाषा गावतुरे यांचा फेसबुक हॅक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here