भाजपाशी संबंध नाही- चंदू पाटील मारकवार

0
480

आमचा कॉंग्रेस पक्षा सोबत कोणताही संबध नाही, आम्ही अपक्ष अविरोध निवडून आलो आहोत, अनावधाने माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यात आला, मात्र आता आपली चूक लक्षात आल्यांचे राजगडचे सरपंच रविंद्र चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. राजगडचे उपसरपंच, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार यांचेसह ग्राम पंचायत राजगडचे सदस्य उपस्थित होते. जी बी

दोन दिवसापूर्वी राजगडचे सरपंच रविंद्र चौधरी यांनी चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते भाजपात प्रवेश घेतला होता. आपण सामाजीक मंदिराचे मागणीकरीता गावातील काही नागरीकांसोबत गेलो होतो मात्र तेथे आपला पक्ष प्रवेश घेतल्यांचे त्यांनी यावेळी सांगीतले. आपले सोबत कुणीही सदस्य यावेळी उपस्थित नव्हते असेही त्यांनी सांगीतले.

आपण कॉंग्रेसचे सदस्य नाही, राजगड ग्राम पंचायतीत आम्ही सर्व अविरोध निर्वाचीत झालो आहोत. आपसात चर्चा करूनच आम्ही सर्व निर्णय घेत असतो. मात्र कॉंग्रेसला खिंडार पाडून राजगडच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश अशा मथळ्याखालील बातमी देणे चुकीचे असून, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून अशी अपेक्षा नव्हती असे मत उपसरपंच चंदू पाटील मारकवार यांनी व्यक्त केली. आजपर्यंत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजगडच्या विकासाचे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले नाही. चांदा ते बांदा प्रकल्प भाजपा पदाधिकारीचे पत्र नाही म्हणून राजगडचे प्रस्ताव मंजूर केले नाही असा आरोप मारकरवार यांनी यावेळी केला. भाजपातून आपण सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्यांचे सरपंच चौधरी यांनी यावेळी सांगीतले.

पत्रकार परिषदेला ग्राम पंचायत सदस्य सचिन भांदककर, अमर वालदे, रेवता ठाकूर, रोशना कलसार, मनिषा हजारे, शुभांगी अलाम उपस्थित होते. फसवून भाजपात प्रवेश करवून घेतल्याचा सरपंच रविंद्र चौधरी यांचा आरोप.

Previous articleसुधीर मुनगंटीवार मूलच्या विद्यार्थ्यांना ही भेट देणार?
Next articleगर्दीतून मार्ग काढत महिलेने केले ना. मुनगंटीवार यांचे औक्षण बहिणीच्या प्रेमाने भारावले ना. सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here