मूल:- ( कुमुदिनी भोयर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमदवार संतोष रावत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपले नमांकन अर्ज दाखल केले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार सुधाकर अडबाले यांचे सह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठा समुदाय उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात संतोष रावत यांची लढत असून राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
महाविकास आघाडी कडून कोण लढणार यांचा तिसरा सुटल्यानंतर, संतोष रावत समर्थकांनी आजच्या शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि संतोष रावत यांचे नामांकन रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने राव समर्थकांचे आशा पल्लवीत झाले आहेत.
संतोष रावत यांनी नामांकन दाखल करण्यापूर्वी भांडेकर लॉन येथे जाहीर सभेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. कोणत्याही परिस्थितीत बल्लारपूर विधानसभेचा गड आपण जिंकायचा असून लोकांचे प्रश्न प्रधानाने सोडविण्यासाठी आपण तन-मन धनाने प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यकर्त्यात मोठा उत्साह दिसून येत होता.
नामांकन दाखल करण्याच्या अंतिम क्षणी संतोष रावत प्रशासकीय भावनात दाखल झाले व नामांकन अर्ज दाखल केले.