बल्लारपूर मधून संतोष रावत

0
299

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार हे निश्चित झाले असून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष रावत यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात आली.

संतोष रावत हे मागील 25 वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यरत असून, कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत लढायचे असा निर्धार करून मागील एक वर्षापासून तशी बांधणी सुरू केली होती.

संतोष रावत मुल नगर परिषदेचे नगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कारभार केला आहे. सध्या ते मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.

भारतीय जनता पार्टीचे हेविवेट नेते राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत त्यांची लढत होणार आहे.

काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी संतोषराव त्यांच्या पाठीशी असून ते चांगले लढत देतील असा विश्वास ते व्यक्त करीत आहे.

Previous articleमाळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राकेश ठाकरे यांची निवड*.प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी दिले नियुक्ती पत्र
Next articleकार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि हजारोंच्या साक्षीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here