संधी मिळाल्यास ओबीसीचा लढा व्यापक करू- डॉ. संजय घाटे

0
126

चंद्रपूर :- समाजाचे प्रश्न गतीने सोडवायचे असेल तर, राजकीय क्षेत्रात सहभागी व्हावेच लागेल, आपल्याला राजकीय क्षेत्रात यश मिळाले तर, आपण दिल्लीच्या धर्तीवर जिल्हयातील सरकारी शाळांचा कायापालट करू असा विश्वास जेष्ठ शल्यविशारद, ओबीसी नेते आणि बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातील महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा दावा करणारे डॉ. संजय घाटे यांनी व्यक्त केले.

मूल येथील स्थानिक विश्राम गृहात मीट द प्रेसचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आपला जन्म अल्पभुधारक कुटूंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होते. अज्ञान आणि माहीतीचा अभावही होता. मात्र पूर्वीपासूनच अभ्यासाची गोडी असल्यांने, शाळेत आपण टॉपवर असायचो. आमचे शिक्षक शंकरराव गिर्हे यांनी मला त्या काळात खूप मार्गदर्शन केले. बारावीच्या परिक्षेत जीवशास्त्र—भौतिक शास्त्र—रसायनशास्त्र या गटात मी राज्यात पहीला आलो, पीसीएम ग्रुपमध्येही मी अव्वल होतो. त्यामुळे एम.बी.बी.एस.करीता आपला प्रवेश सहज झाला मात्र याबाबतची कुठलीही फारशी माहीती नसल्यांने, अडचण निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेत आपण अद्यावत ज्ञान घेण्यांचा प्रयत्न करतो, याकरीताच आपण विदर्भातील शस्त्रक्रिय करणारे डॉक्टरांची संघटना उभी केली, आज या संघटनेचे 8000 चे वर सभासद आहेत. या संघटनेमुळे डॉक्टरांना वैद्यकीय शास्त्राचे शस्त्रक्रियेचे अद्यावत ज्ञान मिळत आहे, ज्यांचा लाभ डॉक्टरांसोबतच रूग्णांनाही होत असल्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

आपण स्वत: शस्त्रक्रियेत निपून आहोत, माझी पत्नी स्त्रीरोग तज्ञ आहे, मात्र अशाही स्थितीत आपण आपल्या आईला, गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सरपासून वाचवू शकलो नाही, हा आपल्यासाठी खूप दुखदायक प्रसंग होता असे सांगत, ज्या बिमारीने आपली आई वारली, ते दुख इतरांच्या वाट्याला येवू नये म्हणून गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सरचा उपचार करणारी यंत्रणाच आपण चंद्रपूरात आणली. याकरीता आवश्यक प्रशिक्षण घेण्याकरीता आपली पत्नी हीला पुणे, मुंबई, दिल्ली येथे पाठविले अशी माहीती देतानाच, आपल्या आईचे मृत्युनंतर क्रियाकर्मवर खर्च न करता, त्या खर्चात दरवर्षी ​विविध गावात आरोग्य शिबीर घेत गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सरग्रस्त महिलांचा मोफत उपचार, मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करीत असल्यांचे त्यांनी सांगीतले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध स्तरावरील संस्था, संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग असून, चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते शस्त्रक्रिया विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले असल्यांचे सांगीतले.

मागील पाच—सहा वर्षापासून ओबीसी जनजागृतीकरीता मंडल यांत्रेचे विदर्भात ते आयोजन करतात, राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला सरकार घाबरत असल्यांचे लक्षात आल्यावर ओबीसीवर अन्याय होवू नये याकरीता आपण राज्यात पहीली ओबीसी पंचायत घेतली, ओबीसींचा लढा दिला, यामुळेच सरकारला मराठा समाजाला सरसकट ओबीसीत टाकणे शक्य झाले नाही असेही त्यांनी सांगीतले.

जीचेवर आपण प्रेम केलो, तीचेसोबतच आपल्या लग्नाची गाठ बांधल्या गेली ही आपल्या जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण असल्यांचे डॉ. घाटे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

सामाजीक प्रश्न राजकीय पटलावरून सोडविण्याकरीता आपण राजकारणात सहभागी होत आहोत. 2019 मध्येच आपण चंद्रपूर शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष होतो याकडे त्यांनी लक्ष वेधत बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून आपली दावेदारी असल्यांचे त्यांनी सांगीतले.

आमदार म्हणून संधी मिळाल्यास, दिल्लीच्या धर्तीवर सरकारी शाळा निर्माण करणे आणि जिल्हयातील आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, शेतकर्यांच्या जमिनीचे पट्टे देणे ही कामे प्राधान्याने करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले.

Previous articleनिष्क्रियताच भाजपाला संपविणार – संदिप गिऱ्हे यांचे मत
Next articleगावातील अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज चितेगाव येथील शेकडो महिला पोलीस ठाण्यात धडकल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here