निष्क्रियताच भाजपाला संपविणार – संदिप गिऱ्हे यांचे मत

0
501

चंद्रपूर:-भाजपानी विकासाचा केवळ बागुलबोवा निर्माण केला आहे. प्रत्यक्ष लोकांचा विकास झालेला नाहीच. विकासाप्रती निष्क्रियताच भाजपाला संपविणार असल्यांचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राचे ​इच्छूक उमेदवार संदिप गिर्हे यांनी आपले मत व्यक्त केले.

प्रेस क्लब मूलच्या वतीने आयोजीत विश्राम गृह मूल येथे आयोजीत मीट द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. गिऱ्हे यांनी सांगीतले कि, त्यांचा जन्म मामाच्या गावात मध्यप्रदेशात झाला. प्राथमिक शिक्षण मूल तालुक्यातील राजोली गावात झाले. काही काळ ते मामाच्या गावातही राहीले मात्र येथे आपले करीयर घडणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी चंद्रपूर गाठले आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजीक काम सुरू केले.

शाखा प्रमुख, तालुका उपप्रमुख, युवासेना जिल्हाध्यक्ष ते शिवसेना जिल्हाप्रमुख असा प्रवास करताना आपल्याला अनेक संघर्ष करावा लागला असल्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

आपले वडिल बाळासाहेबांच्या विचाराचे कट्टर शिवसैनिक होते, त्यांचेमुळेच आपण शिवसेनेत आलो असेही त्यांनी सांगीतले. दिवंगत खासदार बाळूभाउ धानोरकर यांचेमुळे राजकीय क्षेत्रात आपल्याला चांगलेच यश मिळाले. त्यांचे पाठींबामुळेच आपण राजकारणात मोठी झेप घेवू शकलो, मात्र ज्यावेळी त्यांनी 2019 मध्ये शिवसेना सोडण्यांचा निर्णय घेतला, तो माझेसाठी अत्यंत कठीण आणि मन विषन्न करणारा क्षण असल्यांचे त्यांनी सांगीतले. त्यावेळी आपण हिमंत ठेवून, जिल्हयात शिवसेना वाचविण्यांचा निर्धार केला, जिल्हयातील जेष्ठ शिवसैनिकांनी साथ दिली, त्यामुळे कठीण प्रसंगातूनही शिवसेना उभी राहीली. वरोरा भद्रावती वगळता जिल्हयातील सर्व शिवसैनिक आपल्यासोबत राहीले ही आपलेसाठी जमेची बाजू असल्यांचे त्यांनी सांगीतले.

आपला प्रेम विवाह होता, जीचेवर मी प्रेम केले, तीचेसोबतच लग्न करता आले, ही आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्यांचे त्यांनी सांगीतले. तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण कोणता असा प्रश्न केला असता, त्यांनी हे उत्तर दि​ले.

येत्या विधानसभेत, आपण शिवसेनेकडून तयारी करीत आहोत. ही जागा शिवसेनेला मिळाली तर, आपण ती लढवू आणि नक्कीच विजय मिळवू असा आशावाद व्यक्त करीत, जर महाविकास आघाडीने ही जागा शिवसेनेला दिली नाही तर आपण महाविकास आघाडीच्या बाजूने ताकदीने प्रचार करू, कोणत्याही परिस्थितीत भाजपाला ही जागा जिंकू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्यावर सुडबुध्दीने हरण्याच्या भितीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे दबावात तडीपारीची नोटीस बजावण्यात आली असेही त्यांनी सांगीतले.

आपण राजकारणात आलो नसतो तर, आपण करीत असलेला उद्योगच मोठा केला असता असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

मीट द प्रेसचे प्रास्ताविक प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अमीत राउत यांनी केले. आभार प्रदर्शन धमेंद्र सुत्रपवार यांनी केले.

Previous articleआपल्या हक्कासाठी संघर्ष करुन लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही
Next articleसंधी मिळाल्यास ओबीसीचा लढा व्यापक करू- डॉ. संजय घाटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here