चंद्रपूर :-दि .०२ ऑक्टोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात २३ सप्टेंबर २०२४ रोजी ‘ मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव आंदोलन ‘ घालुन लोक-हितास्तव
नरभक्षी वाघाला जेरबंद ‘ करण्याची करण्याची मागणी संतप्त जन-समुदायाने या आंदोलनाच्या माध्यमाने केली होती. नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात मानव-बळी थांबवले गेले पाहिजेत. यासाठी वाघ जेरबंद करण्याची मुख्य मागणी घेऊन आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्या गेला होता. याबद्दल वन-संरक्षण अधिकारी यांनी वन-विभागाला तसे निर्देश देत कामाला सुरुवात केली होती. त्याच माध्यमातुन मानवाला वन्य-प्राण्यांच्या आक्रमणापासुन वाचवण्याकरिता वन विभागाने योग्य प्रयत्न करून जानाळा नियत क्षेत्रातिल कक्ष क्र.117 मधे टी 83 या वाघिनिला जेरबंद
केल्याची माहिती वृत्ताना दिली आहे.
कित्येक दिवसापासुन मुल तालुक्यात वाघांच्या भ्याड हल्ल्यात मानव बळी गेल्याच्या बातम्या वारंवार कानावर पडत होत्या. त्यासाठी आक्रमक पवित्रा घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख श्री. संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजुर, महिला, युवक, विद्यार्थी, नागरिक तसेच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलन केले गेले. या आंदोलनातील मुख्य मागण्या घेऊन वन- संरक्षण अधिकारी कार्यालयावर आंदोलन झाले होते. यातील ‘ प्रमुख मागण्या ‘ मुल तालुक्यातील मानवबळी घेणाऱ्या वाघांचा तातडीने बंडोबस्त करून नरभक्ष वाघांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबांस तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच जंगली प्राण्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून; योग्य ती आर्थिक मदत द्यावी,जांगलालग शेताला सौरक्षण कंपन द्याव,शेतकर्याना झटका मशीन द्यावी,चिचपल्ली येथिल वनस्रक्षक कार्यालय मूल येथे स्थानांतरित करण्यात याव अशा नाना-विध मागण्या घेऊन; मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव घातल्या गेला. तद्नंतर संबधित अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या नंतर आंदोलनाला यश प्राप्त झाल्यानंतर आंदोलन शांत करण्यात आले होते.