राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविला नाही!
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : देशाचे तथा कुवेत येथील आदरणीय राजे शेख सहाब अल अहेमद अल सबेर अल सहाब यांचे २९ सप्टेंबरला निधन झाल्याने रविवारी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. या दुखवट्यात राष्ट्रध्वज थोडा खाली उतरवून सन्मान दिल जातो.मात्र येथील कारागृहात आज ४ ऑक्टोंबरला राष्ट्रध्वज हा खांबाच्यावरच फडकत असल्याने कारागृह अधिक्षकांचा दुर्लक्षितपणा दिसून आला.त्यामूळे अनेकांनी या संदर्भात रोष व्यक्त करीत कार्यवाहीची मागणी केली आहे.
कुवेत येथील आदरणीय राजे शेख सहाब यांचे २९ सप्टेंबरला निधन झाले. रविवारी ४ ऑक्टोबरला सरकारने एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या एका दिवसात होणारे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढून सुचित केले आहे. त्यामूळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर फडकविण्यात येणारा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला गेला. व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर असा काही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, सिनेमा क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यात येतो. मात्र आदेश असतांनाही बुलडाणा जिल्हा कारागृहात आज ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रध्वज वरच फडकत असल्याचे दिसले. त्यामूळे एका देशाच्या राजाचा मृत्यूनंतरचा हा अवमान असल्याचे बोलल्या जात असून संबधितांवर कार्यवाहीची मागणी केली जात आहे.या विषयी जिल्हा कारागृह अधीक्षक संजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधन्यात आला परंतु त्यांनी फोन उचलला नाही,तर तुरुंग अधिकारी हिवाळे यांनी या राष्ट्रीय दुखवटयाबद्दल अनभिज्ञता दर्शवली व आम्हाला या बाबत काही माहित नाही, असे उत्तर देत आपली जबाबदारी झटकली.