मूल :- नुकतीच गोंडवाना विद्यापीठामध्ये झाडी बोली साहित्यासाठी स्वतंत्र दालन सुरू करण्याकरिता मा. प्र. कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले. त्यात अध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर च्या प्रसिद्ध कवी प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर यांची नियुक्ती करण्यात आली.
झाडीबोली साहित्य दालन समितीत नियुक्ती झाल्याबद्दल झाडी बोलीचे महर्षी मा् हरिश्चंद्र बोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अध्यक्ष
अरूण झगडकर,सचिव लक्ष्मण खोब्रागडे झाडीबोली समिती चंद्रपूर.
अध्यक्ष, सुखदेव चौथाले, महिला अध्यक्ष शशीकला गावतूरे झाडीबोली साहित्य समिती तालूका मूल, झाडीबोली शब्दसाधक परमानंद जेंगठे, नागेंद्र नेवारे , वृंदा पगडपल्लीवार, माधुरी लेनगुरे यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.