कोणतेही जर मंत्राच्या साह्याने उतरवत नाही. आपले जीव वाचवण्याकरता नागमोत्याकडे (मांत्रिक) न जाता दवाखान्यातच जाऊन उपचार करा” – यश कायरकर

0
142

तळोधी (बा.) :

नागभिड तालुक्यातील ओवाळा येथे ‘साप, अंधश्रद्धा व कायदा’ या विषया अनुषंगाने स्वाब संस्थेचे वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वाब नेचर केअर फाउंडेशन व श्री साई बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सर्पदंशाच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते त्यामुळे अशा सर्पदंशाच्या घटना घडू नये व सर्पदंशा नंतर कोणतीही जिवीत हानी होऊ नये. या करीता हा सापांबध्दल चा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी स्वाब चे पर्यावरण व स्वच्छता मोहीम प्रमुख छत्रपती रामटेके यांनी सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तथा संस्थेचे शैक्षणिक व कार्यालयीन विभाग प्रमुख नितीन भेंडाळे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.

सापांच्या विविध प्रजाती त्यांची ओळख व सापाची मनुष्याला असलेली भीती का वाटते आणि ती दूर घालवण्याकरता, परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी, बिनविषारी व निमविषारी सापाबद्दल माहिती देत सर्पदंशाचे कारण आणि सर्पदंश टाळून नेण्याकरता घ्यावयाची काळजी, जिल्ह्यात नेमकेच विषारी साप असून त्यासारखेच दिसणारे बिनविषारी साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता दवाखान्यात जावे व योग्य औषध उपचार करावा असे संस्थेचे सर्पमित्र तथा संरक्षण दल प्रमुख जिवेश सयाम यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना सांगितले.

यश कायरकर यांनी मार्गदर्शक म्हणून सापांच्या अंधश्रद्धा व कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी देशातील सर्पदंशामुळे मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू व त्या मागचे कारण आणि अंधश्रद्धा याबाबतही सविस्तर माहिती देत. “सर्पदंश झाल्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार करा कोणत्याही नागमोती व मांत्रिकाच्या कडे जाउ नका, सापाचे जहर हे मंत्राने नाही ते फक्त सापांच्या विषापासून बनलेल्या विष प्रतिरोधकथामुळेच उतरू शकते. त्यामुळे नागमोत्यांकडे जाऊन आपले जीव गमावू नका. व जर कोणी असे करत असेल तर त्याकरिता जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या कायद्याबद्दल व या कायद्याच्या व्यापकतेबद्दल मार्गदर्शन केले.

सतत वन्यजीव, पर्यावरण, करिता कार्य करणार्या स्वाब संस्थेच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात होणारे सर्प दंश व मृत्यू टाळून नेण्याकरिता, व लोकांचे जीव वाचवण्याच्या उद्देशाने स्वाब संस्थेमार्फत संपूर्ण वर्षभर परिसरातील गावांमध्ये हा अवेअरनेस प्रोग्राम राबविण्यात येतो. त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामध्ये हे प्रोग्राम गावागावांमध्ये जाऊन घेणे सुरू असून यानंतर शारदा व दुर्गा उत्सवामध्ये सुद्धा हे प्रोग्राम सतत सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.

प्रतिक्रिया :-  (आपल्या जिल्ह्यात व परिसरात मोजकेच विषारी साप असून त्यासारखे दिसणारे अनेक बिनविषारी साप आहेत. त्यामुळे सर्पदंशाच्या नंतर घाबरून जाऊ नका व शासकीय रुग्णालयात जा व स्वतःचे जीव वाचवा” -जीवेस सयाम.)

या यावेळी स्वाब संस्था चे पदाधिकारी सर्पमित्र विकास लोणबले, अमन कडकडे , अमीर करकाडे , शुभम निकेश्वर, आकाश मेश्राम, तर श्री बाल गणेश मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते, ओवाळा ग्रामपंचायत च्या सरपंचा व पोलीस पाटील तथा शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Previous articleमूल चंद्रपूर मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात
Next articleघोडाझरी तलाव परिसर केला प्लास्टिक मुक्त ( स्वाब नेचर केअर संस्था च्या स्वच्छता मित्रांनी राबविली मोहीम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here