जीवनात खिलाडी वृत्ती ठेवल्यास आयुष्य आनंदाचे होते – ठाणेदार सुमित परतेकी : प्रेस क्लब मूल चा Meet the Press उपक्रम

0
125

मूल :- प्रेस क्लब मूलचे वतीने आयोजीत ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.

मुळचे नागपूरचे रहीवासी असलेले ठाणेदार परतेकी हे संपन्न घराण्यातून आले. वडिल पोलिस विभागात असल्यांने, बालपणापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे असेच स्वप्न त्यांनी पाहील्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सांगीतले.

ठाणेदार सुमीत परतेकी स्वत: पोलिस विभागात ठाणेदार आहेत, त्यांची पत्नीही पोलिस विभागात आहे, त्यामुळे कौंटूबिक अडचणी निर्माण होतात काय? या प्रश्नावर त्यांनी, आमचे कौटूंबिक बायडिंग खूप चांगली असल्यांने, तशा अडचणी निर्माण झाल्या नाहीत ही आशादायी बाब असल्यांचे त्यांनी सांगीतले.

आपण पोलिस विभागात रूजू झालो नसतो तर, वनविभागात नौकरी केली असती असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती, नागपूर येथे नौकरी केल्यांने, कायद्याचे बारकावे समजता आले, स्ट्रॅटेजी आखता आली असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

माझी पीएसआय म्हणून झालेली नेमणूक ही आपल्यासाठी आपल्या जीवनातील आनंदाची घटना असल्यांचे सांगीतले तर, मूल शहरात रूजू झाल्यानंतर दोन महिण्यातच मूलचे नेते संतोष रावत यांचेवर झालेला गोळीबार आपल्यासाठी धक्कादायक होता हे कबूल करीत, याच दरम्यान आपली आई आयसीयूत भरती असल्यांने, आपल्या जीवनातील तो कठीण प्रसंग असल्यांचे त्यांनी सांगीतले.

शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्यांचे सांगून, सीसीटीव्ही मुळे अनेक गुन्हे उजेळात येत आहे, अनेकांना त्यामुळे लाभ देता येत आहे. मूल येथील सीसीटीव्ही मुळे सिंदेवाही, नागभीड, सावली, गडचिरोलीसह अनेक शहरातील गुन्हेगांराचा छडा लावता आला याचे अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगीतले.

आपण मागील एक वर्षात 105 अवैद्य दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्यांचे सांगीतले तर, काही मोक्काची प्रकरणे प्रस्तावीत केले असल्याची माहीती दिली. जनावरांच्या तस्करी थांबविण्यात आपल्याला यश आल्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

आपण स्वत: कबड्डीचे खेळाडू होतो, जीवनात खेळाला खूप महत्व आहे. प्रत्येकांनी कोणतातरी खेळ खेळले पाहीजे. खेळात हार—जीत होत असते, हरले तरी कमीपणा वाटून घेवू नये तर जिंकले तर, अतीउत्साही होवू नये. हार—जीत खेळाचा भाग आहे. युवकांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी, आता सर्व स्पर्धा परिक्षात पारदर्शीपणा आहे. अभ्यासात सातत्यपणा असले तर यश सहज मिळते याकडे त्यांनी त्यांनी लक्ष वेधले. अपघाताचे वाढते प्रमाण आणि डोक्याला मार लागून मृत्यूचे वाढत असलेल्या घटना पाहता, प्रत्येकांनी स्वत:साठी चांगल्या प्रतिचे हेल्मेट वापरावे असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या भागात वन्यप्राण्यांच्या हल्याचे वाढते प्रकरण चिंतेचे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी समस्या असल्यांचेही त्यांनी सांगीतले.

प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय सिध्दावार यांनी मीट द प्रेसचे आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. संचालन अमित राऊत यांनी तर आभार प्रदर्शन धर्मेद्र सुत्रपवार यांनी केले.

Previous articleमूल शहरातील ताडाळा रोड येथील पथदिवे सुरू करा भूमिपुत्र ब्रिगेड मूलची मागणी
Next articleमुल न.प.चे जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी दिली डॉ. अभिलाषा गावतुरे यांना मागणी पूर्ण करण्याची ग्वाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here