चंद्रपूर जिल्हातील वेकोली शक्तीनगर वसाहत आणि पदमापुर खदानच्या सीनाळा गावाचे पुनर्वसन वेकोलि तर्फे केलेले आहे. ह्या परिसरातीत राहणाऱ्या एका मुलाला दी 20.09.24 ला संध्याकाळी 6 च्या सुमारास घराच्या मागच्या बाजूने 6 वर्षीय मुलाला बिबट्याने हल्ला करून लगतच्या वेकोली च्या परिसरातील झाडीझुडपात नेले. दुसऱ्या दिवशी वनरक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्या मुलाला शोध घेतला. दीं 21.9.24 ला सकाळी 11.30च्या दरम्यान त्या मृतक मुलाचे चार तुकडे मिळाले.
मात्र अजून पर्यंत त्या बिबट्या ला पकड्याण्यात यश मिळाले नाही. त्या बिबट्या सोबत त्याचे 2 बच्चे असल्याने त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले असल्याचे वनविभाग सांगण्यात आले आहे.