मेहकर : तालुक्यातील कळंबेश्वर शिवारात शिवाजी काळे यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने अशोक त्र्यंबक आदमाने वय 48 यांनी आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी एका खाजगी बँकेतून कर्ज काढले असल्याचे समोर आले. त्यांच्या पश्चात मुलगा तीन मुली दोन भाऊ असा परिवार आहे.