यश कायरकर:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा च्या मूल बफर क्षेत्रामध्ये जंगलात गुरे चारायला गेलेल्या गुराख्यावर परिसरात भटकंती करीत असलेल्या वाघाने हमला केल्याने गुराखी मृत झाल्याची घटना घडली. चिचोली येथील निवासी देवाजी राऊत हा गुराखी आपले गुरे चारण्याकरिता जंगलामध्ये गेले असता आज दुपारी ४ वाजता चे दरम्यान वाघाने हमला करून ठार केल्याची घटना आज घडली.
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला व शवविच्छेदनाकरता मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
वारंवार वाघाच्या हल्ल्यात गुराखी मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतांना वनविभागा तर्फे गुराखी व जंगला शेजारी शेती असलेले शेतकरी यांना जंगलात किंवा शेतात जांताना काय काळजी घ्यावी याची माहिती व सुचना वारंवार देउनही याकडे दुर्लक्ष केले जाते..एकीकडे वाघांची वाढती संख्या व दुसरीकडे शेतीसाठी जंगलावर होणारे अतिक्रमण हे वाघांच्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत आहे.. वनविभाग व लोकसहभागातून यावर तोडगा काढला पाहिजे.. वन्य प्राण्यांच्या हमल्यांमध्ये जीव गेल्याने वन्य प्राण्यांबद्दल व वन विभागाबद्दल परिसरातील लोकांमध्ये आकस निर्माण होते.
“वन विभागाने वारंवार केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जंगलामध्ये प्रवेश केल्याने हा घटना घडतात. त्यामुळे लोकांनी असे राखीव जंगलामध्ये गुरे चारायला नेऊ नये. कारण गुरांचा पाठलाग करीत हिस्त्र प्राणी हे शिकारी करता कधी कधी गावातही येतात. व मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढतात. त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नये म्हणून परिसरातील लोकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.”
-उमेश झिरे, संजीवन पर्यावरण संस्था, मुल