मूल तालुक्यातील कांतापेठ येथील उपसरपंच,सदस्य, कार्यकर्त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश

0
243

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुल तालुक्यातील कांतापेठ या गावातील मा.उपसरपंच, सदस्यांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,राजाभाऊ ठाकरे, उपसरपंच विक्की येलमे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा पक्षप्रवेश झाला.

गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यानी शिवसेना पक्षप्रवेश केला, अशी माहिती या वेळी पक्ष प्रवेशकर्ते मा.उपसरपंच राकेश भोयर, सदस्य अविनाश सोपणाकर,मारोती वाढई,खुशाल सोपनकार, माणिक गुरूनले ,मेहुल चौधरी ,महेश मोरे,रजत मांडाळे,सत्यवान आत्राम, देव ठाकरे, संजू ढोले, विशाल कावळे ,शरद शेंडे ,वसंत वाढई ,व आदी युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातप्रवेश केला. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवा दुपट्टा घालून शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले.यावेळी कांतापेठ उपसरपंच विक्की येलमे,शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार,राज ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुल तालुक्यातील कांतापेठ या गावातील अनेकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

 

Previous articleजनप्रकाश पदयात्ररा मुल तालुक्यात सुरू जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद  
Next articleशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुल तालुक्यातील विरई येथील भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश बल्लारपुर विधानसभेत संदिपभाऊ गिऱ्हे यांना मिळत आहे पहिली पसंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here