डोमा येथे अस्वलाच्या पिल्याचा मृत्यू 

0
117

 

शंकरपूर

डोमा मुक्ताई मार्गावर वरील वन विभागाच्या नर्सरी जवळ अस्वलाचा मृत्यू झाल्याचे घटना रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकिस आली.चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपवन क्षेत्रातील डोमा बिटातील गट क्रमांक 470 मध्ये सकाळी वन विभागाचे कर्मचारी भ्रमंती करीत असताना त्यांना अस्वलाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले हा नर अस्वलाचे पिलू जवळपास दीड वर्षाचा आहे या अस्वलाचा मृत्यू एक दिवस आधीच झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या पील्याचा मृत्यू त्याच्या शरीरावरील असलेल्या जखमामुळे कोणत्या तरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेची माहिती होताच सहाय्यक उपवनसंरक्षक गायकवाड वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर वनपाल औतकर वनरक्षक सोनुले ,बुरले तरुण पर्यावरणवादी मंडळाचे आमोद गौरकर वीरेंद्र हिंगे विजय गजभे यांनच्य समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून चिमूर येथील वैद्यकीय अधिकारी राऊत व शंकरपूर येथील वैद्यकीय अधिकारी देशमुख यांनी शविच्छेदन केलेले आहे या नंतर अस्वलाला त्याच ठिकाणी जाळण्यात आले आहे.

Previous articleप्रा.डॉ. किरण बोरकर- कापगते गोंडवाना विद्यापीठाच्या स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर साहित्य अध्यासन समितीवर
Next articleविद्युत करंट लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू मेंडकी पोलीस चौकी हद्दीतील खळबळ जनक घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here