मूल :- दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने भारतीय जनता पक्ष मुल शहर यांच्या कडून मुल शहरात भव्य गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येत आहे, सदर स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अश्या दोन गटात घेण्यात येत आहे, सार्वजनिक गटात प्रथम बक्षिस रोख रु 31001/- व शिल्ड, द्वितीय क्रमांक रोख रु 21001/- व शिल्ड तर तृतीय क्रमांक रोख रु 11001/- व शिल्ड असणार आहे, तर घरगुती गटात प्रथम क्रमांक रोख रु 7001/- व शिल्ड, द्वितीय क्रमांक रोख रु 5001/- व शिल्ड, तृतीय क्रमांक रोख रु 1001/- व शिल्ड, त्याचप्रमाणे घरगुती गटात दहा विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे असणार आहेत, स्पर्धेत कितीही दिवसाच्या गणेश मंडळाला किंवा घरगुती गणेश स्पर्धकांना सहभागी होता होणार आहे,स्पर्धेचे परीक्षण मूर्तीची सुबकता, सजावट आणि सामाजिक संदेश याच्यावर असणार आहे, स्पर्धेत सहभागी होउ इच्छिणाऱ्या मंडळ व स्पर्धकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गणेश मेश्राम यांच्याशी 8421813176 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.