चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री प्रशांत मधुकरराव कवासे, विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसूर्ला यांना प्रदान करण्यात आला.
काल ५सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री धायगुडे साहेब उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षक आमदार श्री सुधाकरअडबाले , अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक, निकिता ठाकरे शिक्षणाधिकारी माध्यमिक , श्री देशमुख साहेब इ . उपस्थित होते.
मूल तालुक्यातून निवड झालेले श्री प्रशांत कवासे हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसूर्ला येथे भाषा विषय शिक्षक म्हणून कार्यरत असून उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात .शाळेतील विविध नाविण्यपूर्ण
उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या या सत्करा मुळे त्यांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाल्या बद्दल श्री. बी. एच. राठोड गट विकास अधिकारी पं.स. मूल,वर्षा पिपरे मॅडम गटशिक्षणाधिकारी पं. स. मूल, श्री. कुमरेसाहेब शिक्षण विस्तार अधिकारी, श्री कोपुलवार केंद्रप्रमुख केन्द्र भेजगाव , श्री सुरेश टिकले सर मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.