मूल :-वार्ड क्रमांक 1 येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची नियोजित जागा आहे. व त्या चौक ला अहिल्यादेवी होळकर चौक असा नाव सुद्धा दिलेला आहे,परंतु मागील काही महिन्यात नियोजित जागेला लागून अतिक्रमण करून त्यांच्या गेट पासून दहा फूट असा फोर व्हीलर जाण्याकरिता स्लोप मारलेला आहे. परंतु स्लोप वाहतुकीसाठी अडचणीचा असल्याने तो स्लोप काढून वाहतुकीसाठी सुरळीत करावा व बाजूला धनगर समाजाचा नियोजित जागेला *फेवर ब्लॉक* (गट्टू) लावून सौंदर्यगीकरण करण्यात यावा. याकरिता भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष नितेश मॅकलवार,सचिव सचिन आंबेकर, धनगर समाजाचे जेष्ठ नागरिक शामराव कंकलवार,बंडूजी मर्लावार,हर्षद धुळेवार,राजू मेडिवार,दीपक लंबूवार,अंकित कटकेलवार,सोहन यारेवार, प्रणय बेंगले व धनगर समाजाचे कार्यकर्ते व भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.