बाजार गणेश मंडळ मुलच्या वतीने भव्य बैल पोळा उत्सवाचे आयोजन

0
74

 

मुल शहरातील गुजरी चौकातील बैल पोळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे, मागील वर्षी पासून स्थानिक बाजार चौक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भव्य प्रमाणात बैल पोळ्याचे आयोजन सुरू केले आहे, या वर्षी शेकडो जोडयांनी स्पर्धकांच्या रुपात सहभाग नोंदविला, स्पर्धेत चुरस बघायला मिळाली, प्रथम बक्षिसासाठी दोन स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने ईश्वर चिठी टाकण्यात आली, त्यात प्रथम क्रमांक मनोज बोर्डावार यांना मिळाला, स्व भावनाताई टहलियानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नातंवंडांकडून रोख रु 5001 व शिल्ड देण्यात आली, द्वितीय क्रमांक मयूर कावळे यांना मिळाला, त्यांना माजी नप सभापती प्रशांत समर्थ यांच्या सौजन्याने रोख रु 3001 व शिल्ड देण्यात आली, तृतीय क्रमांक माजी नप उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांचे कडून रोख रु 2001 व शिल्ड देण्यात आली, चतुर्थ क्रमांक मारोती कावळे यांना मिळाला, त्यांना रवींद्र बोकारे यांच्या सौजन्याने रोख रु 1001 व शिल्ड देण्यात आली, पाच ते आठ क्रमांकाचे पुरस्कार अनुक्रमे गणेश बुटले, मनोज कावळे,गनेश शेरकी, मधुकर गुरनुले यांना देण्यात आले, या पुरस्कारासाठी प्रत्येकी चामडी बॅग देण्यात आली, चामडी बॅग व शिल्ड हे नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार यांच्या सौजन्याने देण्यात आल्या, प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी व प्रा सुधीर नागोसे यांनी परीक्षकांच् काम चोख पार पाडल, नगर भाजप अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नप उपाध्यक्ष मोतीलाल टाहलियानी, प्रवीण मोहूरले, माजी नप बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगर महामंत्री चंद्रकांत आष्टनकर, किशोर कापगते, रिंकू मांदाडे, संजय मारकवार, ऍड बल्लू नागोसे, प्रमोद कोकूलवार, प्रवीण मोहूरले यांची समारंभाला विशेष उपस्थिती होती, मंडळाचे सदस्य सर्वश्री प्रेषित निकोडे, यश बोकारे, तन्मय संतोषवार,वैभव निकुरे, विक्की रामटेके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Previous articleवाघाच्या हमल्यात गुराखी ठार मूल बफर परिसरातील घटना
Next articleदुर्गा मंदिर सेवा समिती व युवाशक्ती व्यायाम मंडळ तर्फे भव्य तानापोळ्याचे आयोजन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here