मूल
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या व मोकाट डुकरांची आणि गुरांची संख्या नेहमीच जाणवते याबाबत पालिकेने उपाययोजना हाती घ्यावी. मोकाट गुरांच्या मालकांना पूर्व कल्पना देऊन तंबी घ्यावी त्यांच्याकडून कुठलाही प्रचार आल्यास दंडात्मक कारवाई हाती घ्यावी अशा विविध मागण्या केल्या. मुख्याधिकारी संदीप दोडे यांनीही याबाबत महिला पदाधिकाऱ्यांना सकारात्मकता दर्शवत येणाऱ्या काळात या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मीनल आत्राम शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख भारती राखडे, शहर प्रमुख अर्चना सहारे उपशहर प्रमुख उर्मिला कोहळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.