गोसेखुर्द नहराची पाड फुटल्याने खरकाडा तलावा झाले रिकामे: धान पिकांना बसणारं फटका

0
131

 

 

यश कायरकर, (तालुका प्रतिनिधी):

नागभिड तालुक्यातील जनकापूर येथिल मामा तलावातील संपुर्ण पाणी गोसेखुर्द नहराची पाड फुटल्याने तलावातील ८० टक्के पाणीसाठा वाया गेला असुन फक्त २० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने धान पिकांचे उत्पन्न कसे घेणारं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असुन फुटलेली नहराची पाड त्वरीत बांधुन देण्यांत यावी यासाठी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावर्षी २० जुलै रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. परिणामी परिसरातील नदी, नाले, तलाव तुडुंब भरले मात्र जनकापूर येथिल खरकाडा मामा तलावांचे पोटातुन गोसेखुर्द नहराचा कालवा गेला आहे. तलावापेक्षा कालवा खुपचं खाल असल्यामूळे व नहराची पाड निकृष्ट बांधकाम असल्यामुळे गेले दहा वर्षापासुन फुटतं असते. त्यामुळें तलावातील पाणी कालव्याद्वारे वाहुन गेल्याने तलावात फक्त २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला त्यामुळें धान पीकांचे उत्पन्न कसे घ्यायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असुन ही फुटलेली गोसेखुर्द नहराची पाड त्वरीत बांधुन देण्यांत यावी अशा मागणीचे निवेदन नुकतेच गोसेखुर्द उजवा कालवाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यांत आलें असुन निवेदनाची प्रत आ.बंटी भांगडिया चिमुर, तहसिलदार नागभिड, यांना देण्यात आल्या आहेत. सदर मागणीची दखल न घेतल्यास नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्याचा इशारा सुरेश डाहारे, आशिष काशिवार, पुरुषोत्तम काशिवार, ज्ञानेश्वर काशिवार, चुकाराम काशिवार, दयाराम काशिवार, विजय बोरकर, श्रिराम गुरनुले आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.

Previous articleश्री गुरुदेव कला मंच तळोधी (बा.) च्या वतीने सामुहीक रक्षाबंधन सोहळा संप्पन्न
Next articleशिवसेना महिला आघाडी तर्फे पोलिस स्टेशन मुल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here