फिस्कुटी येथील शेतात जाळीत अडकलेल्या अजगराला संजीवन संस्थेने दिले जीवदान
यश कायरकर:
मूल तालुक्यातील फीस्कुटी या गावात महेश शेंडे यांचे घरा लगत असलेल्या शेतात एक अजगर जाळीत अडकला असल्याची माहिती फीस्कुटी चे सरपंच श्री नितीन गुरनुले यांनी संजीवन पर्यावरण संस्थेला दिली.माहीती मिळताच संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, पंकज उजवने, रितेश पिजदुरकर, दिनेश खेवले,ओम पाल, हौशीक मंगर यांनी घटनास्थळी जाऊन जाळीत अडकलेल्या अजगराला जाडीतून सोडवून त्याला नंतर सुरक्षित जंगलामध्ये सोडून दिले.त्यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आजूबाजूला महिनाभरापासून पूर आल्यामुळे पुरात वाहून आलेले अजगर हे शेतामध्ये किंवा गावाच्या आसपास निदर्शनास येतात तसेच तलावामधून वाहणाऱ्या पाण्यातून जात असताना मच्छर वाहून जाऊ नये म्हणून लावलेल्या मच्छीमारांच्या झाडीमध्ये हे अजगर अडकतात, त्यामुळे असे कोणतेही साप किंवा प्राणी जाळीत अडकलेले दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधावा श असे उमेश झिरे यांनी सांगितले.