डॉ सचिन भेदे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ चंद्रपूरपोंभूर्णा येथील मुख्य चौकाला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या अखिल भारतीय माळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष भुजंगभाऊ ढोले यांची आंदोलन स्थळी डॉ सचिन भेदे यांचे शिष्ट मंडळ यांनी भेट घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रशासानाला दिला.
जिल्हा अध्यक्ष डॉ. सचिन भेदे यांनी शिष्टमंडळासह डॉ. सुरेश जाधव मुख्याधिकारी नगर पंचायत पोंभूर्णा यांच्या सोबत चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेऊन मागणी पूर्ण करा अन्यथा डॉ. सचिन भेदे यांनी इशारा देला कि, मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण माळी समाज बांधव आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन तीव्र करू असा अल्टीमेटम दिला आहे.
अखिल भारतीय माळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी ५ ऑगस्टला नगरपंचायचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष्यांना दिलेल्या निवेदनात चौकाला क्रांतिज्योती सावित्रीआई फुले असे नाव देण्याच्या मागणीसाठी सात दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. मात्र चौकाच्या नामकरणाच्या विषयावर नगरपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी दि. १६ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सोबतच श्रीकांत शेंडे तालुकाध्यक्ष भूमिपुत्र ब्रिगेड यांनी सुद्धा साखळी उपोषण सुरु केले आहे.
याप्रसंगी समाजाचे शिष्टमंडळ डॉ. सचिन भेदे, प्रा. माधव गुरनुले, ऍड. प्रशांत सोनुले, यांनी भेट दिली यावेळी सद्गुरु ढोले, चरण गुरनुले व समाज बांधव उपस्थित होते.