मूल येथे समाजातील नेते गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन

0
700

प्रतिनिधी कुमुदिनी भोयर

मुल येथे समाज संघटित करण्याच्या उद्देशाने सकल कुणबी समाज संघटना मूलद्वारा आयोजित समाज भूषण खासदार आमदार विविध क्षेत्रातील समाजाचे दिग्गज नेतेमंडळी आणि समाजातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2024 ला मासा कन्नमवार सभागृहात दुपारी 1 वाजता कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल तालुक्यातील प्रतिष्ठित जेष्ठ नत्थू पाटील आरेकर, उद्घाटन मार्कंडेजी लाडवे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती चंद्रपूर -वनी-आर्णी चे खासदार प्रतिभाताई धानोरकर, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी विकास व वने डॉ. परिणय फुके, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे शिक्षक मतदार संघ विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधाकर अडवाले चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संदीप गिऱ्हे, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप चौधरी, जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूरचे अर्चनाताई चौधरी, पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वासुदेव पाल, गडचिरोली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,भाजपचे सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक जगद्गुरु संत तुकाराम महाराज सकल कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था मुल, सकल युवा कुणबी समाज संघटना,सकल महिला कुणबी समाज संघटना हे सर्व समाजातील मोठ्या संख्येने नागरिक, सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous articleकलकत्त्याच्या नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी चंद्रपुरातील शेकडो डॉक्टर उतरले रस्त्यावर
Next articleपोंभुर्णा शहरातील बसस्टॅण्ड चौकाला क्रांतिज्योती सावित्रीआई फुले नाव द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here