अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर कारवाई करा — कोहळी समाज संघटनेची मागणी

0
364

तळोधी बा:-  पोलीस स्टेशन तळोधी बा अंतर्गत येत असलेल्या वाढोना गावातील समाजसेवा विद्यालय येथील नराधम शिक्षक रुपेश गुलाब डोरलीकर याने त्याच शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विनयभंग केला. त्या विरोधात पोलीस स्टेशन तळोधी बा येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्या आरोपीला अटक करून त्याचेवर पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सद्या हा आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र या आरोपीवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोहळी समाज संघटना तळोधी बा च्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन तळोधी बा. च्या मार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी कोहळी समाज बहुउद्देशिय संघटना तळोधी बा.चे अध्यक्ष सुखदेव भाकरे, डी. टी. बोरकर सर, प्रा. सुभाष बोरकर,श्रीहरी सहारे, विशाल गोपाले, अजीत सुकारे ,अरुण गहाणे,महेश काशिवार, प्रमोद गायकवाड,हरिहर घोनमोडे,यदुनाथ लेंझे, रवी बोरकर, चुकाराम काशीवार,पंकज बोरकर,अमोल भाकरे व समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Previous articleकोहळी समाज स्नेहमीलन व भूमिपूजन सोहळा संपन्न
Next articleस्व. कालीदास अहीर जयंती स्मृतीदिनी 251 रक्तदात्यांचे रक्तदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here