कोहळी समाज स्नेहमीलन व भूमिपूजन सोहळा संपन्न

0
72
  • तळोधी बा. कोहळी समाज बहुउद्देशीय मंडळ तळोधी बा. नागभीड तालुक्याच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा तथा यशवंत व्यक्तींचा सत्कार, समाज भवन भूमिपूजन व कोहळी समाज स्नेहमिलन सोहळा पार पडला*

 

सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रकाश बाळबुद्धे अध्यक्ष-कोहळी विकास मंडळ नागपूर तर विशेष अतिथी म्हणून मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमुर विधानसभा क्षेत्र, मा. दिवाकरभाऊ निकुरे युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस, मा. प्रा.सदानंद बोरकर सचिव-भारतीय शिक्षण संस्था नवरगाव यांच्या विशेष उपस्थित भूमिपूजन व कोहळी स्नेहमीलन सोहळा पार पडला.

 

समस्त कोहळी समाजाच्या वतीने कोहळी समाजाला भूखंड प्रदान केल्याबद्दल *मा. दिवाकर निकुरे युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस* व कोहळी समाज भवणास स्वनिधी दिल्याबद्दल *मा. आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ भेट देऊन उत्स्फूर्तपणे स्वागत-सत्कार करण्यात आला.

तसेच मा. प्रकाशभाऊ बाळबुद्धे व प्रा. सदानंद बोरकर यांचा मंडळातर्फे स्वागत-सत्कार करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना व समाजाला मार्गदर्शन केले. तसेच आमदार बंटी भांगडीया, दिवाकर निकुरे प्रा.सदानंद बोरकर यांनी सुध्दा समाजाला मार्गदर्शन केले. त्यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष सुखदेव भाकरे, रमेश बोरकर, रघुनाथ आर. बोरकर, मोरेश्वर पा. ठिकरे,रमाकांत लोधे आदी मान्यवर उपस्थित होते. नागभीड तालुक्यातील बहुसंख्य कोहळी समाज बांधव, सत्कारमूर्ती विद्यार्थी, मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डी टी बोरकर सर यांनी केले तर प्रास्तविक रमेश बोरकर यांनी केले. व आभार प्रदर्शन समाजाचे अध्यक्ष सुखदेव भाकरे यांनी केले.

Previous articleउमेश झिरे यांनी दिले साडेबारा फूट लांबीच्या अजगराला जीवदान
Next articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर कारवाई करा — कोहळी समाज संघटनेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here