- मूल:- नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रशांत समर्थ यांच्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव करीत मूल शहरात मोठ्या प्रमाणात तसेच गांधी चौक ते गुजरी चौकात बॅनरच लावल्याने मूल बॅनर नगरीच दिसत असल्याची प्रतिक्रिया स्वप्निल श्रीरामे यांनी व्यक्त केली. शुभेच्छा बॅनर लावून समर्थ यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. सकाळी 8 तेच 12 नाष्टाचे वाटप करण्यात आले. वार्डात 12 चेअर लावण्यात आल्या. कोरकू गोंड वस्तीमध्ये ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. दरार चौकामध्ये संध्याकाळी वाढदिवस साजरा करून मित्र परिवारातर्फे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानी सांगता झाली.
यावेळी प्रेमाच्या वर्षावाने भावूक झालेले प्रशांत समर्थ यांनी आमचे प्रतिनिधीशी प्रतिक्रिया देताना प्रशांत समर्थ यांनी आपल्या भावना खालील शब्दात व्यक्त केल्या
माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी जो शुभेच्छांचा वर्षाव केला. बॅनर नगरी तयार केली. त्या प्रेमाने खरंच मी अगदी भारावून गेलो. मला भावी नगराध्यक्ष अशी नवीन ओळख देत अनेक उपक्रम सोबतच माझ्या मित्र परिवाराने मूलमध्ये जे शुभेच्छा होल्डिंग लावले माझा वाढदिवस साजरा केला. स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खरंच मी मनःपूर्वक दरार दुर्गा मंडळ मित्रपरिवार तसेच सर्वांचे आभारी आहे.