बिबट्याला पकडून पिल्लांसोबत स्थानांतरित करण्यात वन विभागाला यश

0
170

यश कायरकर:

नागभीड वनपरिक्षेतील बाळापूर (खुर्द) येथे डिमदेव सेलोटे यांच्या पडक्या गोठ्यात एका बिबट पडक्या तीन पिलांना जन्म दिला उघडकीस आली होती. सोमवारी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्याम गावातील एका व्यक्तीने डिमदेव सेलोटे यांच्या पडक्या गोठ्यातून या बिबट ला बाहेर निघताना पाहिले त्या ठिकाणी पाहिले असता तीन पिल्ले आढळून आले. याची माहिती सरपंच कमलाकर ठवरे यांनी वनविभागाला दिली..वनविभागाने घटनास्थळ गाठून गावात बंदोबस्त म्हणून त्या घराभोवती मोठे झाड लावून त्या गावात वास्तवात असलेल्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावलेला होता. व कडेकोड बंदोबस्त गावात करण्यात आला आहे..यामुळे गांवात उत्सुकता व दहशतीचे वातावरण पसरले होते.

मात्र एक दिवस रात्री माझा बिबट पिल्लांस जवळ येऊन परत निघून गेली होती त्यामुळे पुन्हा एक दिवस वाट बघून काल रात्र साडेदहा ते अकराच्या दरम्यान परत ती माझा बिबट येऊन पिल्लांना ठेवलेल्या पिंजऱ्यामध्ये जाऊन घुसली व तिला पकडण्यात वन विभागाला यश आले त्यानंतर तिला पिल्लासकट एका सुरक्षित ठिकाणी निसर्ग मुक्त करण्यात आले.

ही कार्यवाही ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, नागभीड चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. हजारे, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. शेंडे, यांनी यशस्वीपणे या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले त्यानंतर ब्रह्मपुरी चे बायोलॉजी राकेश अहुजा चंद्रपूरचे रमाकांत खोब्रागडे वैद्यकीय अधिकारी, आर.आर.टिम चंद्रपूर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात मादा बिबट व बछड्यांना त्याला आई सोबत सुरक्षित ठिकाणी निसर्ग मुक्त केले.

यावेळी तळोधी बाळापूरचे व नागभीडचे संपूर्ण वन कर्मचारी, स्वाब टीमचे बचाव पथकाचे सदस्य हे दोन दिवस या गावांमध्ये मुक्कामाने होते गावातील लोकांनी सुद्धा शांततेत या बचाव पथकामध्ये सहकार्य केले.

“सध्या जिकडे तिकडे पूर परिस्थिती व पाऊस असल्यामुळे परिसरातील वन्यजीव हे गावाच्या दिशेने वास्तव्यास येत असून जंगल परिसरातील व गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी शेतात व गावालगत वावरताना दक्षता घ्यावी.” असा सावधानतेच्या सूचना वन विभागाद्वारे या संदर्भाने देण्यात आलेली आहे.

Previous articleक्रांतीदिनाचे औचित्य साधून ‘अबे पोट्टे हो फ्रेम नितेश कराळे मूल नगरीत’
Next articleएफ ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात सायबर जनजागृती एक दिवसीय कार्यशाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here