यश कायरकर: तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर (हेटी) बीटातील 97 – 98 च्या कंपार्टमेंटच्या सीमांकन लाईनवर नागभिड- बल्लारशा रेल्वे मार्गावर तळोधी रोड- आलेवाही किलोमीटर 1152/03 मध्ये N/BOX या मालगाडीच्या धडकेत रानगवा ठार झाल्याची घटना रात्री 10:30 वाजता घडली.
रेल्वे गाडी बल्लारशा कडून गोंदिया कडे जात असताना ही घटना घडली. वन विभागाला सूचना दिली असता तरी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला.
शव विच्छेदन हे शालिनी लोंढे पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही यांनी केले. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड ब्रम्हपुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, अमन करकाडे, गणेश गुरनूले, शुभम निकेशर, वन मजूर वामन निकूरे, राजू सेंदरे, अमोल निकूरे, विलास लेनगूरे, इत्यादी उपस्थित होते. शविच्छेदनानंतर रानगव्याला जेसीबीने गड्डा करून पुरविण्यात आले.
विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर सतत रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे जीव जाणे हे नित्याचीच बाब ठरली असून, काही दिवसापूर्वी नागभीड- बाळापूर रुट वर मिंडाळा बिट मध्ये,नागभीड वनपरिक्षेत्रामध्ये एक वाघ तर याच आठवड्यात मूल जवळ एक अस्वल, अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये 5 चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आली होती.