संत तुकाराम महाराज भूमिपूजन सोहळ्याला खासदार आमदार यांची प्रमुख उपस्थिती

0
61

अखिल भारतीय कुणबी समाज नागभीड यांचा वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज समाज भवन भुमीपून सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थी व पालक आणि मान्यवराचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन/खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि. आमदार सुभाष धोटे यांची प्रमूख उपस्थीती नागभीड येथे अखिल भारतीय कुणबी समाज तालुका नागभीड च्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज समाज भवन भूमीपूजन सोहळा तसेच ,गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या सन्माननिय व्यक्ती व स्त्रियांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि.28/07/2024 रोज रविवारला सकाळी 11.30 वाजता ग्रामीण रुग्णालय ,तहसिल रोड नागभीड येथे आयोजित केलेला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया ,आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी धोटे,आमदार ,राजूरा विधानसभा तसेच सदर कार्यक्रमास विशेष अतिर्थी तथा सत्कारमुर्ती मा.श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर ,खासदार चंद्रपूर,प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.अनिलजी अवसरे ,युवा प्रबोधनकार व्याख्याते विसोरा ,हे आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.श्री. संजयजी धोटे,(माजी आमदार) मा.श्री.विजयरावजी देवतळे (अध्यक्ष खैरे कुणबी समाज चंद्रपूर) ,मा.श्री.दिगांबरजी गुरपुडे (माजी अध्यक्ष जि.म.सह.बँक चंद्रपूर) मा.गोविंदराव भेंडारकर (माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर तथा नोटरी भारत सरकार) ,मा.श्री.पंजाबराव गांवडे (माजी जि.प.सदस्य चंद्रपूर) मा.श्री.क्रिष्णाभाऊ सहारे,(माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर) मा.श्री.प्रमोदभाऊ चिमूरकर (माजी जि.प.सदस्य चंद्रपूर) मा.श्री.गजाननभाऊ पाथोडे ,(संचालक जि.म मा.सह.बँक चंद्रपूर) ,मा.श्री.प्रकाशजी बगमारे ,ब्रम्हपूरी , मा.विलासरावजी दोनोडे (माजी सभापती कृ.उ.बा.समिती नागभीड),मा.श्री.फाल्गुणजी राऊत, (ब्रम्हपूरी) ,मा.श्री.योगेशजी मिसार,ब्रम्हपूरी ,मा.श्री.मारोतराव जुनघरे (माजी प्राचार्य जनता विद्यालय नागभीड) मा.श्री.नरेंद्रजी हेमणे ,संचालक कृ.उ.बा.समिती नागभीड ,मा.श्री.हरिभाऊ गरफडे (माजी प्राचार्य कर्मवीर विद्यालय नागभीड) , हे असतील .

कार्यक्रमास समाज बांधवानी सहकुटुंब उपस्थित राहून समाज प्रबोधनाचा लाभा घ्यावा तसेच गुणवंताचा उत्साह वाढवावा असे. आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय कुणबी समाज तालुका नागभीड यांनी केले आहे.

Previous articleमूल ची कु. ऋतुजा पडगेलवार बनली सी ए
Next articleपुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांनी दिला मदतीचा हात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here