मुल : तालुक्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या संकल्पनेतून २८ जुलैला भव्य रोजगार मेळावा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळावात देशातील ५० पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहे. पाच हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.या रोजगार मेळाव्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून,विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये मुलाखत पूर्व प्रशिक्षण पार पडल्यानंतर २८ जुलै रोजी मुल येथील नवभारत विद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांना मुलाखत आणि लगेच नियुक्तीपत्र प्रदान करून देशातील नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून क्यूआर कोडद्वारा उमेदवाराना संपूर्ण नोंदणी फॉर्म भरता येणार आहे. रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहित प्राप्त होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभाग घ्यावा,असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी केली आहे.