-
विदर्भातील शेतकरी हा कधी आसमानी संकटांचा तर कधी सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. सतत सुरू असलेली अतिवृष्टी व पिक विमा संबंधी कृषी विभाग व प्रशासनाची अनास्था हे बघून आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांना हवालदिल केलेलं दिसतं आहे. कृषी अधिकारी व कृषी विभागाकडे,प्रशासन यांना वारंवार याचना करून सुद्धा कृषी विभागाकडून इन्शुरन्स कंपनीला विचारणा करण्यात आलेली नाही व नेहमीच उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या दारातून निरुत्तर परत जावे लागत आहे. अशाप्रसंगी किसान कांग्रेस सेल ने काही मागण्या घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली .
शेतकऱ्यांना महाराष्ट्रात तेलंगणाच्या धर्तीवर कर्जमाफी देण्यात यावी, पीक विमा 2023 24 तातडीने मिळावा, अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, CIBIL कक्षेतून शेतकऱ्यांना वगळण्यात यावं ,नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा सरकारच्या घोषणेप्रमाणे त्वरित पैसे वितरित करण्यात यावे, कृषी उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा ,कापूस 15 हजार ,सोयाबीन 10 हजार, धान 5 हजार रुपये असा हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आयात – निर्यात धोरण ठरविण्यात यावे या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने विचार करावा व येथील बळीराज्याला न्याय द्यावा अशी संवाद पूर्ण मागणी काँग्रेस किसान सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. याप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे किसान काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक जी वाढई ,पोंभुर्णा किसान सेलचे तालुकाध्यक्ष विनायक जी बुरांडे ,मुल किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रम गुरुनुले, भोजेश्वरजी मोहुरले ,काँग्रेस चंद्रपूर शहर च्या उपाध्यक्ष सौ छाया सोनुले , डॉ समीर कदम, शुभम कावळे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.