यश कायरकर: ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी मधील नागभीड वनपरिक्षेत्रातील घोडाझरी अभयारण्य लगत असलेल्या मिंडाळा या गावातील शेतकरी दोडकुजी शेंदरे (65) आपल्या शेतावर गट नं. (420) जाऊन काम करीत असताना अंदाजे 5 वाजता अचानक परिसरात वावरणाऱ्या वाघाने हमला करून ठार केले व त्याला जंगलामध्ये नेले. शेतकरी घरी परत ना आल्यामुळे याबाबतची सूचना वन विभागाला देण्यात आली. वनविभागाच्या वतीने शोधाशोध केली असता मृतदेह हे मिंडाळा बीटातील कक्ष क्रमांक 756 मध्ये अंदाजे 50 ते 70 मीटर ओढत नेलेले आढळून आले.
यानंतर सविच्छेदनाला पाठवून तात्काळ वन विभागामार्फत परिवाराला मदत करण्यात आली व घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले. जंगला लगतचे शेत शिवारात वावरताना शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात वन्य प्राण्यांचे वास्तव असल्यामुळे काळजी घ्यावी असे वन विभागाने निर्देश दिलेले आहेत.