सावंगीत घरात घुसला बिबट्या, सहा तासाच्या थरारा नंतर बिबट्याने ठोकला धूम मुसळधार पावसामध्ये रात्री तीन वाजता पासून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वन विभाग व साब संस्थेने केला प्रयत्न

0
158

तळोधी (बा.) तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) या गावांमध्ये ‘सचिन रतिराम रनदे’ यांच्या घरात बांधलेल्या शेड्यांवरती हमला करून त्यांना ठार करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला मात्र सचिनचे वडील तिथेच झोपले असल्यामुळे त्यांना घाबरून हा बिबट वर लादनीवर जाऊन लपला. याची माहिती तात्काळ वन विभागाला व स्वाब टीमला देण्यात आली. तेव्हा रात्रीच मुसळधार पावसातच तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी व स्वाब बचाव पथकाचे सदस्य हे घटनास्थळी पोहोचून घरासमोरील दरवाजाला पिंजरा लावला व घरावर जाळे लावून बिबट्याला पिंजऱ्यात हाकलण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे चोहीकडे मुसळधार पाऊस व संपूर्ण रस्ते पुरामुळे बंद झाल्यामुळे या बिबट्याला बेहोश करण्याकरता विभागाला कोणालाही पाचारण करता आले नाही. व गावात मुसळधार पाऊस सुरू असतानाही या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याचा अतोनात प्रयत्न सुरू होता. मात्र रात्रभर पासून सकाळचे साडेनऊ वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्या जवळ येऊन पुन्हा पुन्हा परत जायचा व शेवटी कवेलूतून वर येऊन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पथकावर वारंवार हमला करीत होता. व शेवटी कवेलू तोडून घरावर चढून मागच्या दिशेला उतरून त्याने जंगलाच्या बाजूने धूम ठोकली. तेव्हा गावातील लोकांनी व पकडण्याचा प्रयत्न करणारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गावाच्या चारही बाजूला पुराने वेडा घातल्यामुळे बचाव पथकाचे स्वाब संस्थेचे व वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी हे त्या गावात दुपारपर्यंत अडकून राहिले.

मुसळधार पावसातही स्वाब संस्था चे वाईल्ड रेस्क्यू टीमचे सदस्य यश कायरकर ,नितीन भेंडाळे, जीवेस सयाम, शुभम निकेशर, गिरीधर निकुरे, अमन करकाडे, व वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, आर. एस. गायकवाड, रासेकर वनरक्षक राजेंद्र भरणे, पंडित मेकेवाड, तोरले, अलाने, जोशी, वळजे पाटील, येरमे यांनी प्रयत्न केला.

यानंतर गावात येण्याच्या मार्गावर पिंजरा लावण्यात आला. लोकांना सुरक्षिततेसाठी सुचना देऊन त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या गावात गस्त सुरू ठेवली आहे.

Previous articleडॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगरझरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, नागभिड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here