Mul:- गेल्या १५ दिवसांपासून मूल तालुक्यातील बेंबाळ गावातील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे सर्व व्यवहार ठप्प पडले असून गावातील शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
नेमक्या पेरणीच्या हंगामात बँकेतील व्यवहार ठप्प पडल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास शेतकऱ्यांना अडचण येत असून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा रखडले आहे.
त्या निमित्ताने BSNL च्या महाप्रबंधकांशी चर्चा करून त्वरित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
मा. महाप्रबंधकांनी त्वरित सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असून निवेदन देतांना विकास विरुटकर, इलियास शेख, सिकंदर खान, विनय धोबे, शुभम मालुसरे, सुरज घोंगे, करण वैरागडे, गिरीश कटारे, ज्ञानेश्वर लोनगाडगे सह ईतर शिवसैनिक उपस्थित होते.