मूल तालूक्यात मुसळधार पावसामुळे पुरसद्श्य स्थिती निर्माण होवून अनेक गांवाचा संपर्क तुटला.अनेक प्रवाशाना आपल्या स्वगावी किंवा कामासाठी निघलेल्या नागरीकांना ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी थांबावे लागले. प्रवासी आता मार्ग चालू होईल हया आशेवर सकाळ पासून व्याकुळतेने वाट बघत होते. सततच्या पावसामुळे पाण्यांचा ओघ वाढत जावून कोणताही मार्ग प्रवासा करिता खुला झाला नाही. त्यामूळे, लहाण मुले बाळे,वयोवृध्द,महिला,शेतकरी बंधू उपासीपोटी मूल येथे बस स्थानकावर ताटकळत असल्याचे बाजार समितीचे सभापती श्री.राकेश रत्नावार यांचे निदर्शनास आले. त्यांनी सामाजीकतेची जाणीव ठेवून सर्व प्रवाशाना तुम्हच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यांत येईल व तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही असे आश्वासीत केले. राकेश रत्नावार हे नेहमी सामाजीक कार्यात अग्रेसर राहून जेव्हा जेव्हा संकटे ओढावतात तेव्हा तेव्हा मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करतात. मूल बस स्थानकावर वरील थांबलेल्या नागरीकाना व एस.टी.कर्मचारी यांना तात्काळ जेवनाची सोय उपलब्ध करून दिली.याकरिता बाजार समितीचे उपसभापती श्री.राजेंद्र कन्नमवार,बाजार समितीचे संचालक अमोलभाऊ बच्चुवार, श्री.गुरूदास चौधरी, श्री.नरेश बोम्मनवार, श्री.आशीष दहिवले, समितीचे कर्मचारी प्रविण चेपुरवार,सहा.सचिव,राजु गेडाम,पर्यवेक्षक,श्री.बबलू सैय्यद,श्री.मंगेश खानोरकर,सामाजीक कार्यकर्ते श्री.विवेक मुत्यालवार,श्री.रूपेश मारकवार,श्री.रंजीत आकूलवार,श्री.संदिप मोहबे, श्री.गौतम जिवने श्री.पठाण साहेब,एस.टी.महामंडळाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.