वाढदिवसाचे नियोजित कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत

0
2294

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या अतिवृष्टी मुळे चीचपल्ली येथे दोन तलाव फुटल्याने गाव जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तत्काळ उपाय योजना करून मदत पुरवा अशी डॉ गवतुरे यांची प्रशासनाकडे मागणी.

चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली गावात दोन तलाव फुटून पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे पहाटेला तलाव फुटल्यामुळे गावातील 200 ते 300 घरात पाणी घुसल्याने सर्व जन जीवन विस्कळीत झालेले आहे तसेच लोकांचे अन्नधान्य, घरगुती सामान व इतर साहित्य यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्यामुळे गावातील लोक त्रस्त झालेले असून खूप नुकसान झालेले आहे एका शेतकऱ्याच्या 45 शेळ्या पाण्यात वाहून गेले आहे तसे गुराढोरांचे सुद्धा नुकसान झालेले आहे सदर परिस्थिती ची माहिती मिळतात डॉक्टर गावतुरे यांनी गावात मोक्यावर जाऊन पाहणी केली अश्या प्रकारची परिस्थिती या आधीही झाली असल्याचे गावातील लोकांनी सांगितले प्रशासनाने कायम स्वरूपी उपाय योजना न केल्यामुळे गावातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तलाव फुटल्याने गावात पाणी घुसले आहे त्वरित त्याची उपाययोजना न केल्यास अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गावात जिल्हाधिकारी साहेब यांनी भेट दिल्यावर डॉ गावतुरे यांनी सोबत सर्व पूर परिथितीची पाहणी केली व त्यांना तेथील समस्याची माहिती देऊन प्रशासनाने त्यावर त्वरित उपाययोजना करून तलावाचे पाणी गावात येण्यापासून अटकाव करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या गावातील लोकांना आवश्यक ती मदत त्वरित पोचवण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी केलेली आहे. पूर परिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ गावतुरे यांनी दि 23 जुलै ला स्वतःचे वाढदिवसाच्या मूल व बल्लारपूर येथील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यात खर्च होणाऱ्या पैशातील मदत पूर ग्रस्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleभूमिपुत्र ब्रिगेड ,मूल द्वारा पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार
Next articleरात्रो भरपावसात भरला सोनापुर गोंविदपुर मार्गावरील पुलीयाचा स्लांब,कंपनीचा मनमानी कारभार,नागरिकांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here