भूमिपुत्र ब्रिगेड ,मूल द्वारा पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार

0
37

गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे मुल शहरात जिकडेतिकडे पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टी मुळे मुल शहरातील वार्ड नंबर 14 येतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले होते .घरातील अनेक वस्तूंची नुकसान झाली. खाद्यपदार्थ, अन्नधान्य खराब झाले . अशा परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी , गरजू भाऊ बहिणींना छोटीशी मदत म्हणून भूमिपुत्र ब्रिगेड, मूल यांच्या द्वारे फुल नाही पण फुलाची पाकळी समजून धान्य किट वाटप केले. त्याप्रसंगी भूमिपुत्र भूमिपुत्र ब्रिगेड शहराध्यक्ष नितेश मॅकलवार आणि पदाधिकारी राकेश मोहुर्ले,सुनील भाऊ कुकुळकार, संतोष चितादे,कपिल गुरनुले आणि कार्यकर्ते या कठीण प्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रशासानाने जनतेची सर्वतोपरी मदत करावी आणि अशा वेळेस भूमिपुत्र ब्रिगेड प्रशासनाच्या सोबत आहे असे सांगितले गेले.

Previous articleमुल शहरात पावसाचे थैमान नाम. मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार प्रशासन अलर्ट मोडवर भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी जनतेच्या मदतीला 
Next articleवाढदिवसाचे नियोजित कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here