घरात घुसलेला बिबट्या जोरबंद मात्र रेस्क्यू पुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात सहा जख्मी, सावली वनपरिक्षेत्रातील घटना.

0
35

यश कायरकर:
सिंदेवाही तालुक्याच्या
शिवनी वनपरिक्षेत्रातील येत असलेल्या शिवनी वनपरिक्षेत्र बफर झोनमधील उपवनक्षेत्र मोहाळी (नलेश्वर) अंतर्गत येत असलेल्या मोहाळी हे गाव जंगलाने वेढले असून या भागात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याने अनेकदा गावात देखील वन्यप्राणी येत असतात. दरम्यान आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नागरिकांना बिबट (मादी) आपल्या दोन पिल्लांसोबत शिकारीच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसली मात्र दरम्यान गावाच्या दिशेने बिबट येताना दिसल्यामुळे नागरिकांनी पाठलाग करून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शेतात झुडूपात असलेले बिबट न दिसल्यामुळे अचानक लोक जवळ गेल्याने बिबट्याने केलेल्या हमल्यात विजय देवगिरीकर 35, मनोहर दांडेकर 50, जितेंद्र दांडेकर 30, सुभाष दांडेकर 25, ऋतिक वाघमारे 18, पांडुरंग नन्नावरे 32 हे सहा लोक जखमी झाले जखमींना तातडीने मोहाळी येथील प्रार्थमिक उपचार केन्द्रांत प्रार्थमिक उपचार करुन चंद्रपुर येथे पूढील उपचारा करीता रवाना केल्याची माहीती मिळाली आहे.
*एका मादा बिबट्याला जेरबंद करण्यात यश, तर दोन बिबट जंगलाच्या दिशेने पसार.*
गावात जमलेल्या गर्दी च्या आरडाओरड मुळे एक बिबट जंगलाच्या दिशेने पसार झाला तर त्या नंतर त्यातिल मादा बिबट बारेकर यांच्या घरातील लादनीवर लपली तर एक बिबट दांळेकर यांच्या घरात लपला मात्र एक बिबट जंगलाच्या दिशेने पडून गेला तर एका मादा बिबट्याला बेहोश करून सुरक्षित रेस्क्यू करन्यात आले. यावेळेस गावामध्ये आजूबाजूच्या गावातील लोकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केलेली होती. मात्र घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्याकरता चंद्रपूर येथून TATR रेस्क्यू टीम , SWAB नेचर केअर संस्थेचे सदस्य व शिंदेवाही वन परिक्षेत्रातील कर्मचारी यांनी घरावर चढून अथक मेहनतीने घरात लादनीवर दळून बसलेल्या बिबट्याला तात्काळ बेहोश करून पकडले. व वन्यजीव ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे नेण्यात आले मात्र रेस्क्यू करण्यात आलेली मादा बिबट ही अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाची असून कोणीतरी तिच्यावर कुराडीने हमला केल्यामुळे तिला जखम असल्याची डॉक्टरांच्या उपचारादरम्यान निदर्शनास आले.
या रेस्क्यू चे वेळेस TATR रेस्क्यू टीम चे डॉ. आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)ता. अं. व्या. प्र. चंद्रपूर तथा आर आर टी प्रमख २)श्री. ए.सी.मराठे, पोलीस नाईक,(शुटर) ता.अं. व्या. प्र. चंद्रपूर , SWAB नेचर केअर संस्थेचे बचाव पथकाचे सदस्य यश कायरकर, छत्रपती रामटेके, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे अमन करकाडे, अमीर करकाडे, गिरीधर निकुरे शिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण व त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे व यांचे पोलीस कर्मचारी, शिंदे बाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर व त्यांचे वनकर्मचारी तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार व त्यांचे वनकर्मचारी तसेच शिवनी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी उपस्थित होते.
मात्र मादा बिबट्याला पकडल्यानंतर ही लोकांनी इतर दोन बिबट्यांना सुद्धा तात्काळ पकडावे म्हणून गावातील महिलांनी कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या पुढे बसून वाहने अडवली त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष दंगारोधक पथक बोलवण्यात आले. वन विभागाने परिसरात कॅमेरे लावून गावामध्ये गस्त सुरू केलेली आहे.

Previous articleबेंबाळ येथील भर पावसाळ्यात ठप्प झालेला पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल डॉ. अभिलाषाताई गावतुरे
Next articleविलम येथील मुलगा पुलावरून फिरताना गेला वाहून शोधाशोध सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here