जीवनापूर शाळेत शिक्षक देन्याची गावकऱ्यांची मागणी ( शाळेत वर्ग 1 ते 8 पर्यंत, एकुण हजेरी पटसंख्या 121 एवठी आहे. तरीही मागील शैक्षणिक सत्रापासून एकच शिक्षक)

0
108

यश कायरकर:

नागभिड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या आलेवाही ग्रामपंचायत अंतर्गत मौजा जीवनापूर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आहे. या शाळेत वर्ग 1ते 8 आहेत वर्ग 6‌ ते 8 पटसंख्या 38 असुन एकुण हजेरी पटसंख्या 121 एवठी आहे. तरीही मागील शैक्षणिक सत्रापासून एकच शिक्षक कार्यरत आहे. तरी आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे गावातील शाळेत तात्काळ विषय शिक्षक व सहाय्यक शिक्षक देणयाची मागनी गट विकास अधिकारी पं. समिती नागभीड व गट शिक्षणाधिकारी पं. समिती नागभीड यांच्या कडे जिवनापुर वासियांनी मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देताना रामदिन नान्हे, पंकज नंदेश्वर, ग्राम सदस्य यदुनाथ लेझे, सुमेध कसारे , अमर लाडे, अमोल निकुरे, हिवराज नमलवार , संदिप वरकलवार, विजय बोरकर ,विशाल गडेवार मस्त गावकरी यांनी निवेदन दिले.

Previous articleकुऱ्हाडीने शीर धडावेगळे केले हळदी येथिल थरारक घटना 
Next articleतळोधी वनपरिक्षेत्रात वन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम ( पेंडाल लावून वृक्ष लागवड व वृक्ष पुरवठ्याबद्दल मार्गदर्शन, तर तळोधी येथील नवानगर शाळेमध्ये वृक्षारोपण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here