मुल येथे विद्यार्थी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार ख्यातनाम वक्ते, प्रखर विचारवंत , युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर करणार मार्गदर्शन

0
344

नुकत्याच 10, 12 वि चे निकाल विद्यार्थ्यांना मिळाले , अनेक विद्यार्थी प्रचंड मेहनत करून शिक्षण घेत आहेत, मात्र मार्गदर्शनाच्या अभावी बरेच विद्यार्थी भविष्यात शिक्षण निवडायच्या विचारात चलबिचल असतात, त्याचप्रमाणे या वयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सखोल मतगदर्शनाची गरज असते, हा उदात्त हेतू लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व क्षेत्रातील आमदार श्रीयुत नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून दिनांक 7 जुलै 2024 ला सकाळी 11.30 वाजता मूल येथील स्व. मा सा कन्नमवार सभागृहात विद्यार्थ्यांसाठी करिअर व व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन आणि सोबतच मुल शहरातील व तालुक्यातील 10 वी व 12 वी च्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, नामदार सुधीर मुनगंटीवार यांची सदर कार्यक्रमात उदघाटक म्हणून उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जीप अध्यक्ष श्रीमती संध्याताई गुरनुले राहतील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हरिषजी शर्मा, जिल्हा महासचिव डॉ मंगेश गुलवाडे, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगराध्यक्ष सौ रत्नमाला भोयर, सौ उषा शेंडे, मा पस सभापती चंदू मारगोणवार, पूजा डोहणे, महासचिव अजय गोगुलवार, चंद्रकांत आशटनकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले ख्यातनाम वक्ते,प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार माननीय सोपानदादा कनेरकर यांचं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन लाभनार असून, ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असणार आहे, सोपानदादा हे प्रसिद्ध वक्ते असून यु ट्युब वर त्यांची अनेक मार्गदर्शन पर भाषण उपलब्ध आहेत, सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष मुल शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे

Previous articleपोलीस स्टेशन तळोधी (बा.) येथे शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण
Next articleकंपनीने टाकलेल्या अन्नातून शेळ्यांना विषबाधा , 8 शेळ्या मृत्युमुखी , मोबदला मिळण्यासाठी कंपनीच्या बाहेर ठीय्या आंदोलन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here