मूल प्रतिनिधी
मूल तालुक्यातील चितेगाव येथे फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दिलीप वसंत कुमरे वय वर्षे 48 असे फाशी लागून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
मृतक दिलीप कुमरे हे ट्रक चालक होते. ते कालपासून घरून निघून गेले होते आज सकाळी चितेगाव बस स्थानकालगत एका झाडाला फाशी लागून असल्याचे उघडकीस आली. ही घटना गावात पसरतात गावकऱ्यांनी बघण्याकरिता गर्दी केली होती. त्यानंतर घटनेची माहिती मुल पोलीस स्टेशनला देण्यात आली. मृतदेह मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात छावविच्छेदन व तपासणी करिता नेण्यात आले आहे. मात्र आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप कळले नाही. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.